Tag: Ghazal in maatraa vrutta

  • नेलकटर – NAIL CUTTER(NEL KTAR)

    जुना पुराणा नेलकटर गोष्ट खरी सांगेल कटर जुना पुराना नेलकटर चेहऱ्यास चाटेल कटर जुना पुराणा नेलकटर नजर कोठडी जेल कटर माय राज मी शक न म्हणत बेशक शक काटेल कटर कापुनही जो जुळवेलच तोच मुला भावेल कटर मला नि मल्ला यात फरक काय तुला कळवेल कटर अर्धेमुर्धे ब्लेड नको म्हणून तुज टाळेल कटर नकली लज्जा…

  • धन्य श्रेणिका – DHANY SHRENIKA

    धन्य श्रेणिका तुझी चेलना भावशुद्धिची देय प्रेरणा कोद्रूचा आहार दिल्यावर शृंखलेतुनी मुक्त चंदना त्रिशलानंदन सिद्धार्थाचा महावीर तीर्थंकर श्रमणा महावीर प्रभु मुनिसंघातिल प्रथम अर्जिका तिला वंदना ज्येष्ठेसह साध्वी भगिनींप्रति कृतज्ञतेची नित्य भावना घोर अंगिरस अरिष्टनेमी मुनी दिगंबर वायूरशना जिनधर्माची ध्वजा फडकुदे गिरनारावर हीच कामना

  • फुले जुईची – FULE JUICHEE

    नाजुक कोमल फुले जुईची नाजुक सुरभित फुले जुईची वारा वाहे झुले पहाया नाजुक शीतल फुले जुईची

  • जा ! जा ! जारे ! वारे ! – JAA ! JAA! JAARE ! VAARE !

    वादळ वारे ! वारे ! म्हणते गा! रे ! वारे ! शीळ वारियाची ही ! स्वर हे सा !रे ! वारे ! म्हणते फुलवत ज्योती ! अरेस का रे ! वारे ! सागर तीरी वेगे ! सुटले खारे ! वारे ! वाह ! वाह ! वा ! वा वा ! लखलख तारे ! वारे !…

  • रतिब – RATIB

    टोक गाठणे आवडते मज तिथुन पाहणे आवडते मज टोकावरती आसन ठोकुन स्वतःत रमणे आवडते मज कातळातला झरा प्रकटण्या त्यास फोडणे आवडते मज खडे कुणीपण कैक टाकुदे खडे काढणे आवडते मज पायवाट शोधून स्वतःची तिला मळवणे आवडते मज ताज्या ताज्या लिहून गझला रतिब घालणे आवडते मज श्रुतपंचमीस विनम्र भावे शास्त्र वाचणे आवडते मज

  • रचना – RACHANA

    नभांगणी लखलखली रचना कडाडणारी बिजली रचना जलदांच्या मालांचे नर्तन मौक्तिकमय थरथरली रचना चिद्घनचपला वीज सुंदरी निसर्गातली असली रचना प्रतोद काळा फिरता सळसळ ठिणगीतुन अवतरली रचना झळाळून उठता मम गझला दिव्य सुनेत्रा स्फुरली रचना

  • अवतार – AVATAR

    अरे माणसा हा झमेला कसा रे कर्म बांधतो तो अकेला कसा रे जरी खाक लंका पुरी जाहलीया वाचला जिनांचाच ठेला कसा रे बिटरघोर्ड म्हणते जरी कारल्याला तरी शब्द घेते करेला कसा रे न घोडे न घोड्या न राऊत कोणी इथे हा ऊभा मग तबेला कसा रे अवतार घेऊन प्रसादास लाटे तुझा देव इतुका भुकेला कसा…