Tag: Ghazal in maatraa vrutta

  • भवंदाज – BHAVANDAJ

    दर्पणी माझिया मौन अंदाज तू लक्ष्य भेदून जाई तिरंदाज तू स्वच्छ ऐन्यामधे बिंब तव श्रीमती आरसा नीर वारा घरंदाज तू शांतता चारुता चंद्रमा अंबरी त्याग मिथ्यात्व अन घे भवंदाज तू डाव दांडू चिनी भारती इंग्रजी उडव तू झेल तू हो गुलंदाज तू मार चौकार रे सा लिही गावया ठोक छक्का सुनेत्रा फलंदाज तू

  • बुमरँग – BOOMERANG

    नवरी मोजे नऊ दिवस नवे नव्याचे नऊ दिवस घट मातीचा धान गहू उगवे वाढे नऊ दिवस चैत्रामधल्या नवरात्री वसंत नाचे नऊ दिवस मेंदी हळदी चुडा मणी झेल टोमणे नऊ दिवस कर्मकरंट्यांना बडगा नव्व्याणवचे नऊ दिवस हाव दागिन्यांना चाटे सोसत फटके नऊ दिवस कौटुंबिक हिंसाचारी मूळ पोसले नऊ दिवस सैल जिभांना आवळता पुरते जिरले नऊ दिवस…

  • कौमार्य – KAUMAARY

    मुक्तक ….. १) पंच-इंद्रिये जिवंतपण अंगात भिजविते ज्वलंतपण संगात भिजविते काया आत्मा पंच-इंद्रिये गोम्मटपण रंगात भिजविते मुक्तक २) अंग-अंग अंग अंग न्हाले सुगंध पेरण्या मृत्तिकेत रंग मिसळूनी काळा बाळ माती खाई नजर चोरून रसनेत रसा घोळूनी चाखण्या पंचोळी ३) कौमार्य साधेपण सौंदर्य जाण भो अंतरीचे माधुर्य जाण भो बुद्धीचे चातुर्य जाण भो ….. दर्याचे गाम्भीर्य…

  • भरते – BHARTE

    समुद्रातले खारे पाणी मृगजळ लहरी फसवे पाणी दुःख मनीचे भरता नयनी गालावर कर्मांचे पाणी कृष्ण घनांना भरते येता जल आनंदाश्रूंचे पाणी तहानलेल्या मृगास फिरवी भ्रम दृष्टीचे कोरे पाणी लीड घ्यावया शिसे पचविते मम इच्छाशक्तीचे पाणी

  • डंडाथाळी – DANDA THALI

    महागाई … शेपू चाकवत कांदापात चुका चवळई टमाटर भात मेथी करडई कोथिंबीर महागाईनं आणला वात खाऊगल्ली … खाऊगल्ली गल्ल्या बोळे पत्रावळी अन शेणगोळे साफ सफाईनं तोंडा फेस कर्मचाऱ्यांची काटे रेस डंडाथाळी… चिकन मासळी अंडा थाळी मटण भाकरी हंडा थाळी वाजवायला थाळी डंडा एक नंबरी फंडा थाळी मुक्तक चारोळी मुक्तक /१६मात्रा

  • कृतार्थ -KRUTARTH

    मुक्तक १) … कृतार्थ कृतज्ञता मम कृतार्थ झाली बुडून कृष्णेत पार्थ झाली ल गा ल गा गा लगावलीने तरून आली स्वरार्थ झाली मुक्तक २)… संदेह म्हणतिल कोणी कष्ट नको कोणी म्हणतिल घाम नको घाण मनातिल जाता जाता घडेल सेवा संदेह नको

  • अंकीलिपी – ANKILIPI

    अंकीलिपी… ब्राम्ही बुटी मम कागदी आहे खरी ब्राम्ही लिपी निर्झर नदी आहे खरी गा आत्मजा गा सुंदरी अंकी लिपी ब्राम्ही स्वरी अक्षरपदी आहे खरी रोमांच… रोम रोम ते रोमांच मस्त शहारे रोमांच ताठ जाहले रोमांच फ़ुलूनी खडे रोमांच