Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कुळवाडीण – KUL VAADEEN

    गझलेची या हडळ जाहली हझल वाचवायला मध्यरात्र होताच जाय ती रान कोळपायला आमटी भाकरी खाऊन पोरगं जाय साळंला मायंदाळ शिकलं मोठं झालं म्यागी पचवायला खारट कडवट पचवून हसतो सदासर्वदा तो पचलं नै वाटतं म्हणतं कोणी त्याला खिजवायला कुळवाडीण शेतात राबते खांब घराचा ती अंगण झाडुन लगबग जाते शेत भांगलायला फिरुन डोंगरी करवंदाच्या पाट्या भरुनभरून मैना…

  • उदक – UDAK

    किती जाहल्या चुका कुणाच्या मोजत बसले नाही हिशेब असला ठेवुन हृदयी भांडे भरले नाही कितीक पात्रे घासघासली आतुन बाहेरूनी साठवुनी जल गढुळ खरकटे तयांस धुतले नाही आले नाही नळास पाणी शुद्धीलाही जेव्हा विहिरीवरुनी केल्या खेपा लोळत पडले नाही क वळीवाचे गारांमधले भरून हौदामध्ये कोरफडीची बाग फुलविली ओटे पुसले नाही वाळा घालुन माठामध्ये उदक सुवासिक केले…

  • मोदक – MODAK

    मोदकांस दे आसन सुंदर कारण त्यातिल सारण सुंदर वर्तमान हा अतीव सुंदर भूतच होता कारण सुंदर ग्रंथ समीक्षा ललित कथांची उघडू त्यांचे बासन सुंदर माझे पुस्तक प्रसिद्ध जगती अक्षर अक्षर पावन सुंदर घर सजण्या मम रम्य भूतली वृक्षांचे संभारण सुंदर जागृत चेतन मन वैमानिक नेणिव दैवी साधन सुंदर गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)

  • ध्वजा – DHVAJAA

    ज्योतीने मी ज्योत लावली ज्योत तेवण्या जीवांची ज्योतीने या धरा उजळली प्रीत पेरण्या जीवांची डोळस अंधांना नयदृष्टी देण्यासाठी ज्योत मिटे काळोखाला टिकवुन ठेवे ठेव ठेवण्या जीवांची करी कुंचला शशिकिरणांचा हाती सृष्टीच्याच असे कैवल्याच्या भिजुन चांदणी कला रेखण्या जीवांची मुनीमनासम नीर वाहते नावेमध्ये शीड उभे रत्नत्रय प्राप्तीच्या मार्गी ध्वजा पेलण्या जीवांची ऐक सुनेत्रा दो नयनांचे दो…

  • दर्रारा – DARRAARAA

    आधी वावटळ येते धूळ फर्रारा उडाया दिशा दाही नाचतात पीळ भर्रारा सुटाया पीळ सांग सोडवाया चक्रीवादळी पिसाटा ओत पोते भरुन मीठ भूत गर्रारा फिराया धाव धाव धावताती कृष्ण मेघ सैरावैरा कडाडते वीज बाई खरा दर्रारा कळाया अंगांगात भुईच्या ग काटे कुसळांची गर्दी मातीवर लोळ लोळे वात खर्रारा कराया शुभ्र टपोर गारांचा मारा ढगातून होई गात…

  • अर्घ्यावली – ARGHYAAVALEE

    मातीलाही स्मरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो वाऱ्यामध्ये तरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो उदकचंदनी रेशिमधारा झेलत असता अंगागावर घटात भूमी भरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो खडीसाखरेसम गारांची जलदांमधुनी वृष्टी होता मातीसुद्धा वरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो तापतापुनी धूप जाळुनी फळाफुलांनी बहरुन येण्या धरा सावळी धरते गाणे वळीव जेव्हा…

  • उच्चारण – UCHCHAARAN

    गरजेपुरते बोलाया उच्चारण उरले नव्हते उधारीतले श्वास घ्यावया तारण उरले नव्हते रंगपंचमी खेळायाला साजण उरले नव्हते इंद्रधनू रेखाया क्षितिजी श्रावण उरले नव्हते भूकंपाचा फेरा आला भूमीताई खचली गाई गुरांना बांधायाला दावण उरले नव्हते बाप न उरला माय न उरली घर ते भणभणलेले थांबायाचे कोणासाठी कारण उरले नव्हते सुस्त अजगरे पडून होती पण सळसळण्या तेजे इच्छाधारी…