Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कर्माला नूतन रोखू – KARMAALAA NOOTAN ROKHOO

    कर्माला नूतन रोखू तू बोट सखीचे धरना आत्माच तुझा हा सुंदर आत्म्यात मला तू बघना करवंदी डोळ्यांमधले बघ काजळ उतरे गाली मिटलेल्या पापण काठी येऊन प्रियतमा निजना काठावर मौन तळ्याच्या जललहरी नाचत येती पाण्यात चांदणे झरते गझलेवर कविता करना हृदयाच्या खोल तळाशी तव दिसते हसरी प्रतिमा तू झुळुक सुगंधी बनुनी अतातरी झुळझुळना रिमझिमत्या आठवणींचा पाऊस…

  • मी पुन्हा जन्मले होते – MEE PUNHAA JANMALE HOTE

    तरही गझल – मी पुन्हा जन्मले होते मूळ गझल – जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते गझलकार – राज पठाण जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते मरणाच्या उंबरठ्यावर मी पुन्हा जन्मले होते मज वाढायाचे होते जन्मात नव्या या सुंदर पण तनू खंगली झिजली म्हणुनच हळहळले होते नव्हताच दुवा कुठलाही जोडाया नाते अपुले तू समक्ष खात्री…

  • तपकिरवाली – TAPAKIR VAALEE

    तपकिरवाली एक मावशी भाव खायची जरी आळशी इरसाल नि ती चालू इतुकी खवट खोबरे देय लापशी पुरती उडवे झोप शिंकुनी मधुर हसूनी मुग्ध षोडशी शिष्य तिचा जणु पुनव चांदणे कशास गुरुजी त्यास चाळशी वीज चपलिनी नजर ‘सुनेत्रा’ तिच्यातुनी तू नीर गाळशी

  • ती मद्रासी – TEE MADRAASEE

    ती मद्रासी सुबक ठेंगणी तो बंगाली बावरा वय सोळाचा कवी मनाचा जरी बोलका लाजरा काजळ नेत्री गजरा लागे रोज रोज मज साजणा एरंडाचे झाड आणखी लावु अंगणी मोगरा हातामध्ये चुडा चमकतो हसते बाला गोजिरी हळद खेळुनी गझलेमधली किती उजळला चेहरा जिन्यावरूनी डौलामध्ये चालत जाई सुंदरा दुरून कोणी रसिक पाहती म्हणते त्यांना सावरा काळ्या केसांचा अंबाडा…

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE

    काय लिहू मी कैसे बोलू शब्द थांबती अडखळती मौन मुग्ध मन सखा सोबती अश्रू गाली झरझरती कधी अचानक बांध फुटोनी भावभावना फुसांडती अज्ञाताच्या कड्यावरोनी आवेगाने कोसळती प्रश्न दाटती कैक मानसी उत्तर त्याचे मिळेलका पुढच्या जन्मी तरी भेटुया गझलेच्या काठावरती तुझे नि माझे नाते कुठले मला सदाचे कोडे हे कोड्यावरती कोडी घालत शब्द वहीवर थरथरती नको…

  • मम सांजेचा रंग केशरी – MAM SANJECHAA RANG KESHAREE

    मम सांजेचा रंग केशरी निळी जांभळी निशा नाचरी प्रभात ल्याली हळदी शालू किती देखणी जरी बावरी सकाळ गोरी मस्त गव्हाळी विरघळलेली मधुर साखरी दुपार सोन्यासम झळझळते संध्या श्यामल दिसे लाजरी संधिकालची बेला सुंदर अधरांवरची जणू बासरी  

  • मंगल बेला – MANGAL BELAA

    मंगल बेला हळदी शेला गझल विड्यांचा शायर ठेला मुखचंद्रावर मस्त तजेला सुंदर स्वप्ने हवी निशेला अमर्त्य आहे माझा चेला