Tag: Ghazal in maatraa vrutta

  • भूमी ताई – BHUMEE TAAEE

    पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक अश्याच…

  • तगडा – TAGADAA

    पाठीमागे कर्तव्याचा लकडा होता पगडीवरती परंपरेचा पगडा होता स्वप्ने होती नेत्रांमध्ये स्वातंत्र्याची पुत्र गबाळा जरी भाबडा लुकडा होता विमान नव्हते बाइक नव्हती पायही नव्हते वाहन त्याचे दो चाकांचा छकडा होता उजळ भाल ते उंच नासिका त्यावर ऐनक असा चेहरा भाव त्यावरी करडा होता जमीन होती कसावयाला हृदयी श्रद्धा तब्येतीने धडधाकट अन तगडा होता

  • पूर्ण भरावे – PURN BHARAAVE

    हृदय प्रीतिने पूर्ण भरावे भरभरुनी मज देता यावे जमिनीवरती पाठ टेकण्या एक चंदनी काष्ठ मिळावे तुझिया नेत्रांमधे प्रियतमा सहज सहज विरघळून जावे मदिरेचीही तहान सरली फक्त वाटते तुलाच प्यावे पंख छाटुनी कषाय भरले म्हणे ‘सुनेत्रा’ उंच उडावे

  • सोटा – SOTAA

    जुळेल आता खरी कुंडली दोघांचीसुद्धा नसेल आता वक्र नजर ग्रह गोलांचीसुद्धा बडबड आता पूर्ण मिटावी सग्यासोयऱ्यांची सरेल अंतर जुळतिल नाती टोकांचीसुद्धा वाट पाहणे शिक्षा नव्हती आनंदे सरली गीते लिहुनी भोगांची अन योगांचीसुद्धा तत्त्व जाणता धर्म जाहला प्रेमाची भाषा तीच असावी देहाची अन आत्म्याचीसुद्धा करे लेखणी तुझी ‘सुनेत्रा’ प्रहार सोट्याचा घेच काळजी लेखणीतल्या सोट्याचीसुद्धा मात्रावृत्त –…

  • सर्व कळव – SARV KALHAV

    शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा

  • मंगल मंगळ – MANGAL MANGALH

    मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा

  • बावन गज – BAAVAN GAJ

    बावन गज मी टाकित गेले जमीन मोजाया सत्तावन फुट खोल उतरले विहीर खोदाया अक्षर अक्षर नीट पारखुन शब्द उभे केले शब्दांना मग वळव वळवले गझला बांधाया शुद्ध जलाने भिजवित गेले निळीभोर वसने चिंब भावना पुन्हा ठेवल्या उन्हात वाळाया चावुन चोथा करून विषया टोळ पुरे थकले निंदक आता बघा लागले मलाच टाळाया बरे जाहले सुटका झाली…