-
आई – AAEE
आई म्हणजे पैंजण छुण छुण आई नाजुक कंकण किणकिण आई नसता घरात भणभण आई असता नसते चणचण छळे गारठा जेव्हा जेव्हा आई बनते मऊ पांघरुण शिणल्यावरती कुशीत घेण्या आई बनते कधी अंथरुण नीज यावया मला सुखाची आई गाते मंजुळ रुणझुण फुलाफुलातुन सुगंध उधळित आई व्यापे अवघे कणकण सुखी कराया तिची लेकरे आई करिते अखंड वणवण…
-
पंक कशाला – PANKA KASHAALAA
साद घालण्या शंख कशाला मनात धरण्या अंक कशाला स्पर्श कराया निळ्या नभाला चुंब फुलांना डंख कशाला रांध चुलीवर अन्न चवीचे फूड हवे तुज जंक कशाला लवचिक होण्या ताठ अंगुली गिरव अक्षरे टंक कशाला संपव कामे मग सुट्टी घे उगाच दांडी बंक कशाला पुण्य कमवुनी रावच व्हावे फुका व्हायचे रंक कशाला बनेन कोकिळ मधुर गावया नाटक…
-
गगन जाहले निळे – GAGAN JAAHALE NILE
कण्हेरमाळा गळा घालुनी मूर्त गोजिरी खुले गुलबक्षीसम अंग रंगवुन सांजसमय सळसळे कृष्णकमळ कातळी उमलता जळी चंद्रमा हले गुलाब पिवळा करी सईच्या बोटांमध्ये वळे प्राजक्ताला धरून अधरी झरझर पळती पळे बकुल फुलांचा सुगंध भरुनी धूप मंदिरी जळे झेंडूचे बन सुवर्णवर्खी वाऱ्यावरती डुले चाफा हिरवा सुगंध वाटित पानांतुन हुळहुळे जास्वंदीची कर्णभूषणे घालुन सजली फुले डेलीयाच्या रंगोलीवर शेवंतीची…
-
येऊदे सय सयी तुझी – YEOODE SAY SAYEE TUZEE
ग्रीष्म बहरता कात टाकुनी, येऊदे सय सयी तुझी हृदयाला गदगदा हलवुनी, येऊदे सय सयी तुझी सय आल्यावर भय थरथरते, गारांसम ते कोसळते ओंजळीत हिम शुभ्र झेलुनी, येऊदे सय सयी तुझी निश्चल काया नयनी वादळ, अधर तरीपण मुके मुके मस्त मोकळे धुंद बरसुनी, येऊदे सय सयी तुझी येच तारके पृथ्वीवरती, बनून अशनी वा उल्का त्या शिलांचे…
-
जमीन सुंदर – JAMEEN SUNDAR
गझलेमध्ये, शेर असावे, किमान तरिहो पाच; रदीफ नसला, तरी चालते, काफिया पण हवाच. सूर ताल अन, लय सांभाळत, गझलीयत येताच; वृत्त असूदे, लाख देखणे, वृत्तीचा का काच? अलामतीला, जो जपतो तो, तोच काफिया खास; पकडाया लय, करून गुणगुण, करा मनातच नाच. मतला म्हणजे, जमीन सुंदर, पहिला बब्बर शेर; फुलवाया गण, अक्षर मात्रा, कधी न घेई,…
-
कोण – KON
गडगड गगनी हसतो कोण नभात मोती दळतो कोण ढगात कापुस भरतो कोण घनामधूनी झरतो कोण पहाट फुलता वाटत मोद फुलांमधूनी हसतो कोण निळ्या समुद्रा भेटायास नदीत लाटा भरतो कोण अंधाराला भेदायास विजेस लखलख म्हणतो कोण जहाज गलबत हलवायास शिडात वारा भरतो कोण वळीव येता भिजावयास चल चल मजला म्हणतो कोण मात्रावृत्त – (८+७=१५ मात्रा)
-
पुरे जाहले साकी – PURE JAAHALE SAAKEE
पुन्हा पुन्हा का भरिशि प्याला पुरे जाहले साकी हृदय भडाग्नी पूर्ण निमाला पुरे जाहले साकी कोळुन प्याले अक्षर मात्रा उकार काना वळणे विसर्ग उरला फक्त तळाला पुरे जाहले साकी दवात भिजणे सुकुन तडकणे मिरवत मिरवत टिकणे चक्र अघोरी हवे कशाला पुरे जाहले साकी भ्रमर भृंग हे अवती भवती फूलपाखरू बघते मधू वाटणे सांग फुलाला पुरे…