-
गझल लिहू – GAZAL LIHOO
ज्यात काफियासुद्धा नाही अशी आगळी गझल लिहू भजले नाही ज्यात कुणाला असे वेगळे भजन लिहू नियमावलीही अशीच बनवु अपवादाला नियम लिहू शब्द आणखी अक्षर विरहित टिंबटिंबचे कवन लिहू अंबर आभाळी आकाशी नाव नभाचे गगन लिहू कुंपण घालुन बोरीभवती पाटीवरती सदन लिहू जुळवायाला अचूक मात्रा डोळे झाकुन नयन लिहू अलामतीला ठेवु सलामत वायुऐवजी पवन लिहू धूसर…
-
शुभ्र झरा – SHUBHRA ZARAA
शुभ्र झरा खळखळतो आहे तुषार अगणित दळतो आहे पूर्ण जरी ना कळला मजला थोडा थोडा कळतो आहे वेलींवरच्या कळ्या बघाया मागे मागे वळतो आहे जे झाले ते बरे तरीही उगाच तो हळहळतो आहे पदर उडविण्या मुग्ध प्रियेचा पवन किती सळसळतो आहे
-
ऐनक – AINAK
उंचावुन तव रेखिव भृकुटी शरसंधाने मरतो मी मिटल्या नेत्रा चुंबिताच तू जिवंत होउन उठतो मी सजणे धजणे पिंड न माझा असा न भावे स्वतःस मी ऐन्यावरची धूळ झटकता मम रूपावर भुलतो मी सतेज कांती ताठ नासिका ऐनक नीतळ नजरेचा हनूवटीवर खळी पाडुनी किती लाघवी हसतो मी कर्तव्याचे मला न ओझे तो तर माझा धर्म खरा…
-
घड्याळ माझे – GHADYAAL MAZE
लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे जुनी ब्याटरी बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर मूढ अडमुठ्या…
-
घडा – GHADAA
घडा गडगडे गोल गड्या हलते पाणी तोल गड्या अर्थ जाणण्या मौनांचा बुडी मार तू खोल गड्या भाव नेत्रिचे हरिणीसम अर्थ काढणे फोल गड्या अमोल माझी गझल गुणी तिचे खरे कर मोल गड्या अनुभूतीचे मिळव गरे साल फळांची सोल गड्या अचूक टिपणे ही माझी पकडण्यास तव झोल गड्या गरगर भिरभिर नजर फिरे मम डोळ्यांवर डोल गड्या…
-
खरे नबाबी – KHARE NABAABEE
नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी नको प्रिय…
-
चपला – CHAPALAA
व्यर्थ कुठे हळहळली नाही अधेमधे ती वळली नाही सुबोध भाषा या गझलेची पण मूढांना कळली नाही नागीणीसम असून चपला भिववाया सळसळली नाही जरी पेटली जरी भडकली कुणावरीही जळली नाही तेल तापता फुलून आली अर्धी कच्ची तळली नाही वादळ गारांच्या माऱ्याने फांदीवरुनी गळली नाही परिघामधुनी सहजच सुटली इथे तिथे ओघळली नाही मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)