Tag: Ghazal in maatraa vrutta

  • घड्याळ माझे – GHADYAAL MAZE (my wall clock)

    लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे जुनी ब्याटरी  बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर मूढ अडमुठ्या…

  • घडा – GHADAA (earthen pot)

    घडा गडगडे गोल गड्या हलते पाणी तोल गड्या अर्थ जाणण्या मौनांचा बुडी मार तू खोल गड्या भाव नेत्रिचे हरिणीसम अर्थ काढणे फोल गड्या अमोल माझी गझल गुणी तिचे खरे कर मोल गड्या अनुभूतीचे मिळव गरे साल फळांची सोल गड्या अचूक टिपणे ही माझी पकडण्यास तव झोल गड्या गरगर भिरभिर नजर फिरे मम डोळ्यांवर डोल गड्या…

  • हजरजबाबी – HAJAR JABABI (quick witted)

    नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी नको प्रिय…

  • चपला – CHAPALAA (lightning)

    व्यर्थ कुठे हळहळली नाही अधेमधे ती वळली नाही सुबोध भाषा या गझलेची पण मूढांना कळली नाही नागीणीसम असून चपला भिववाया सळसळली नाही जरी पेटली जरी भडकली कुणावरीही जळली नाही तेल तापता फुलून आली अर्धी कच्ची तळली नाही वादळ गारांच्या माऱ्याने फांदीवरुनी गळली नाही परिघामधुनी सहजच सुटली इथे तिथे ओघळली नाही मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)

  • मोक्षानंद – MOKSHAANAND (spiritual joy)

    त्रास सरावा श्वास मिटावा श्वास मोकळा शुभ्र हसावा शुभ्र मनाचा रंग खुलावा रंग प्राशुनी सुगंध यावा सुगंध भरला देह फळावा देहामध्ये प्राण असावा प्राणीमात्रा मोक्ष मिळावा

  • सुपली – SUPALEE ( sweepings pan)

    सुकली खपली उडली खपली गहू चवीचा असली खपली रडकी कन्या हसली खपली भरण्या कचरा सुपली खपली जखमा भरता धरली खपली नकळत माझ्या पडली खपली स्वर्ग गाठण्या गळली खपली मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)

  • जगण्याचा उत्सव – JAGANYAACHAA UTSAV (festival of our own living)

    मी माझ्या जगण्याचा उत्सव तू माझ्या फुलण्याचा उत्सव आठवणी रंगात बुडवुनी प्रेमाने खुलण्याचा उत्सव रिक्त जाहल्या धरणांमध्ये तुडुंब जल भरण्याचा उत्सव मोद वाटुनी मुदित होउनी खळखळुनी हसण्याचा उत्सव काव्यसरींच्या धारांमध्ये चिंब चिंब भिजण्याचा उत्सव मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)