Tag: Ghazal in maatraa vrutta

  • सण मनभावन – SAN MANBHAAVAN

    हिरव्या पानी फुलेल फुलवा सुगंध उधळित हसेल मरवा सतेज हळदी कुंकुमवर्णी प्रीत प्राशुनी भरेल गडवा मंदाग्नीवर मृदुल करांनी काटेरी घन खुलेल हलवा गोड हासऱ्या लेकींसाठी फांदीवरती झुलेल झुलवा अनुरागाचे गीत गुलाबी रागामध्ये सुरेल बसवा सत्त्यासाठी प्रेमासाठी सैनिक अमुचा लढेल कडवा वाण लुटाया संक्रांतीचे सण मनभावन असेल बरवा मात्रावृत्त (८+८=१६)

  • आत्म परीक्षण करण्यासाठी – AATM PARIKSHAN KARANYAASAATHEE (for taking self test)

    आत्म परीक्षण करण्यासाठी दिवस आजचा पुरेलका आत्म परीक्षण करण्यासाठी नयनी पाणी भरेलका जगण्यासाठी हवेच मीपण मरण्यासाठी कर तू तू आत्म परीक्षण करण्यासाठी इतुके मीपण पुरेलका तर्क लावुनी मिळेल उत्तर असेल जर तो प्रश्न खरा आत्म परीक्षण करण्यासाठी प्रश्न उत्तरी झरेलका जिंकशील जर करुन परीक्षा दुसऱ्यांमधल्या न्यूनांची आत्मपरीक्षण करण्यासाठी आज अहंपण हरेलका अर्थ जाणण्या आत्मबलाचा नाम…

  • हायहिल्स – HAAYHILS(HIGH HEELS)

    हायहिल्स ती घालुन तेव्हां चालायाची टेचातं कधी न गजरा आणि फुलांना माळायाची केसातं ऐकत राही प्रश्न जरी ती उत्तर देई मौनातं नयन झुकवुनी भल्याभल्यांना पाडायाची पेचातं गर्द दुपट्टा सावरीत कधि पायघोळ ती मॅक्सीतं नित्य लपेटुन मोहक साडी भिजे श्रावणी मेघातं रंग सावळा खुलवण्यास ती क्रीम लावुनी गालांसं गुलबक्षीसम अधर मुडपिता वीज सळसळे देहातं भाग न…

  • सत्यशोधन – SATYA-SHODHANASATHI (for finding the truth)

    भरड पिठाची, केली पोळी, सत्यशोधनासाठी मी कर्मांची, केली होळी, सत्यशोधनासाठी नीटनेटके, रचुन स्मृतींना, बांधियले प्रेमाने जळी बुडविण्या, केली मोळी, सत्यशोधनासाठी अहंकार अन, मिथ्यात्वाचे, करुन वस्त्रगाळ चूर्ण सहज फेकण्या, केली गोळी, सत्यशोधनासाठी मत्त वासना, तुडवुन पायी, जुळवुन दो हातांना ओंजळिची मी, केली झोळी, सत्यशोधनासाठी एकएकटे, कषाय गाठुन, कत्तल करण्यासाठी देवगुणांची, केली टोळी, सत्यशोधनासाठी मात्रावृत्त(८+८+१२ =२८ मात्रा)

  • कातरवेळी – (“In the twilight hour”)

    धगधगत्या अग्नीत तावुनी, शुध्द जाहले! असत्यास मी, ठार मारण्या, सिध्द जाहले! वसुंधरेवर, जीवन फुलण्या, प्रपात असुनी; धबाबणारा!  शृंखलेत मी, बध्द जाहले! सुरभित शीतल, लहर असोनी, बघुन भडाग्नी; हपापलेला! क्षणभर चंचल, क्रुध्द जाहले! तन मन कणखर, बंध अनामिक, तोडण्यास मी; कर्म जाळले! कातरवेळी विध्द जाहले! सांजवात लावून अंतरी, बघत राहिले… समाधीत मम, रमण्यासाठी, बुध्द जाहले! मात्रावृत्त…

  • बंड – BAND (rebellion)

    वनराईची नित्य नवी आरास तुझ्यासाठी झरे वल्लरी घेतिल आता श्वास तुझ्यासाठी अधरांचे हे बंड असावे संयम खरा खरा पानांवर बघ दवबिंदुंची रास तुझ्यासाठी मात्रावृत्त(८+८+१०=२६ मात्रा)

  • ‘मी’पण ‘तू’पण – ‘MEE’PAN ‘TOO’PAN ( me too you too)

    मीपण तूपण, उकळत गेले, मी तू मी तू, म्हणता म्हणता… अधरांवरती, गरळ साठले, छी थू छी थू, म्हणता म्हणता… अर्क सुगंधी, कडवट कोको, चहा पातिचा, दुधाळ कॉफी पेय कपातिल, उडून  गेले, पी तू पी तू, म्हणता म्हणता… प्रेम प्रियेचे, कधि न जाणले, फक्त बोचरे शब्द ऐकले हयात सारी, संपुन गेली, ती तू ती तू म्हणता…