-
पाणी – water
-
कळते वळते – to know and to adapt
This ghazal is written in maatraavrutt(32 matraas). Here Radeef is valate(वळते) and kaafiyaas are kalate, falate, jalate( कळते, फळते, जळते) etc. नीर क्षीर जे विवेक जपती त्यांची भाषा कळते वळते कुरुप मनाची कुरुप गोष्टही त्यांच्यासंगे फळते वळते शब्दांमध्ये भरून कटुता कुणी भिजवुनी तयांस पिळता पीळ काढुनी ऊन देउनी वीष त्यातले जळते वळते मधुर भावना मुग्ध…
-
वनहरिणी – wild doe
This ghazal is written in maatraavrutt. Here radeef is Malaa( मला ) and kaafiyaas are laagel, vaatel, saangel(लागेल, वाटेल, सांगेल) etc. इतुके रोखुन पुरे पाहणे, नजर तुझी लागेल मला जरी रांगडी मी वनहरिणी, लाज किती वाटेल मला रोमांचांनी फुलेल काया, बघता बघता बिंब तुझे अन हृदयीचा दिडदा दिडदा, मंत्र णमो सांगेल मला जलवंती मी निर्झरबाला,…
-
दवबिंदुंची निर्मळ भाषा – pure language of due drops
दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई कशामुळे ही…
-
सम्यग्दर्शन – right faith
सम्यग्दर्शन नाजुक अंकुर जादू त्याची खरी खरी हृदयामधली शमवी गुरगुर जादू त्याची खरी खरी दिवा अंतरी उजळे सुंदर ज्ञान आपुले झळाळण्या चारित्र्याचा तेवे कापुर जादू त्याची खरी खरी गुरे वासरे कुरणामध्ये अभय होउनी चरताना मंजुळ वाजे गळ्यात घुंगुर जादू त्याची खरी खरी नाद अनाहत गाभाऱ्यातिल जेंव्हा जेंव्हा घुमे खिरे शिल्पी घडवी मंदिर गोपुर जादू त्याची…
-
वाग्देवी – goddess of speech
-
शीळ – whistling
भृकुटीवरचा तीळ आवडे वळणदार तव पीळ आवडे भरवतेस मज प्रेमभराने शब्द तुझा मग गीळ आवडे मुक्त पाखरू उडे बागडे तुझी वारिया शीळ आवडे करून गुन्हे थकती त्यांना लपावयाला बीळ आवडे सफेद कपड्यांना तू माझ्या घातलीस ती नीळ आवडे मोहांधांच्या पायामध्ये बसवलीस ती खीळ आवडे तांब्या पितळेच्या भांड्याना आत कल्हई कथीळ आवडे गायब झाल्या नोटा अवचित…