तरही गझल
गझलेची पहिली ओळ कवी निशिकांत देशपांडे यांची
गझलेची पहिली ओळ कवी निशिकांत देशपांडे यांची
मनमोकळे करावे कोणापुढे कळेना
सारेच ऐकवीती श्रोता कुठे दिसेना
कुंडीतल्या तरूवर लिहिल्या उदंड गझला
जाऊ कुठे विकाया बाजारही भरेना
वेलीवरी फुलांच्या गर्दीत मूक पाने
जो तो म्हणे अहाहा ! कोणी फुले खुडेना
हे काफिये गझलचे असुदेत तंग ढगळे
टाळूनिया तयांना लिहिणे मला जमेना
पंचेंद्रिये झरोके करण्यास नित्य कर्मे
त्यांच्याशिवाय आत्म्या गाडी पुढे पळेना
सारेच ऐकवीती श्रोता कुठे दिसेना
कुंडीतल्या तरूवर लिहिल्या उदंड गझला
जाऊ कुठे विकाया बाजारही भरेना
वेलीवरी फुलांच्या गर्दीत मूक पाने
जो तो म्हणे अहाहा ! कोणी फुले खुडेना
हे काफिये गझलचे असुदेत तंग ढगळे
टाळूनिया तयांना लिहिणे मला जमेना
पंचेंद्रिये झरोके करण्यास नित्य कर्मे
त्यांच्याशिवाय आत्म्या गाडी पुढे पळेना