चपला …
पत्रामधले भाव अक्षरी जांभुळलेले मेघ जणु
जलद गतीने झरे लेखणी चपला घेते वेग जणु
मुसळधार पाऊस कोसळे घनमालेतुन परसात
परिमल भिजल्या बकुळ तळीचा दूर पोचला शहरात
कांदा …
पाऊस उभा थरथरतो कोसळताना
होत जांभळा सळसळतो कोसळताना
कापता वीज कांद्यासम उलगडताना
पापण्यांतुनी झरझरतो कोसळताना
पेग…
लाटांतुन उसळे भरतीचा आवेग
अंबरी झळकतो बिजलीचाआलेख
चल घेऊ आता शेवटचा हा पेग
भंगल्या प्रीतिची सांधूया ती भेग