काही स्फुट अस्फुट चारोळ्या
…
झीट
झकास कांदेपोहे;पेरून कोथिंबीर..
खाऊन जल्दी जल्दी;चक्क मारला तीर..
नारळ फोडून खोवले;खवणीवरती नीट..
करून बर्फी मोदक;आली बाई झीट..
…
बाप्ये
मिठात पिळुनी लिंबू;कलश घासले धुतले..
भांडे बाजारातील;बाप्ये उठून गेले..
तांब्यापितळेची भांडी;ठिपक्या-ठोक्यांची नक्षी..
ध्यान लावूनी सांजेला;किती बैसले पक्षी..
…
इंच
सुंदरतेची फांदी;पाने हिरवी कंच..
मुक्या कळ्या अन फुलांसभोती;चाफेकळीचा इंच..
चाफा चंद्रावरती;किरण प्राशुनी गेला..
शिडी लावता उंची;परतून खाली आला..