ऋतू सुखाचे येतिल आता – RUTU SUKHACHE YETIL AATA


ऋतू सुखाचे  येतिल आता
धरणीसंगे गातिल आता

पडेल पाऊस वेळेवरती
धान्याने मग भरतिल पोती
फळ फळावळ भाजीपाला
गाई गुरांना चारा ओला
कमी न काही पडेल आता

ऋतू सुखाचे येतिल आता
धरणीसंगे गातिल आता

रानामध्ये झरे वाहतिल
झाडांवरती घरटी झुलतिल
फूलपाखरे आणिक भुंगे
हवेत उडतिल संगे संगे
माणूस आता होईल दाता

ऋतू सुखाचे येतिल आता
धरणीसंगे गातिल आता

वाड्या-वस्त्या स्वच्छ  देखण्या
कुणी न लाजे कामे करण्या
लांडी-लबाडी आणिक चोरी
करेल कोणी ना शिरजोरी
कुणी न मारिल फसव्या बाता

ऋतू सुखाचे  येतिल आता
धरणीसंगे गातिल आता


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.