पल्लवित मन झाले तरुचे
सुमन सुकले काळे तरुचे
भाव घन अंबर धर नभ हे
थोपवित शर भाले तरुचे
वाऱ्यात सळसळत्या पाती
वाजतात ग वाळे तरुचे
दवबिंदूं चे करित शिंपण
पूजन अर्चन चाले तरुचे
काव्य कळ मी जलद सुनेत्रा
सहज उघडे टाळे तरुचे
पल्लवित मन झाले तरुचे
सुमन सुकले काळे तरुचे
भाव घन अंबर धर नभ हे
थोपवित शर भाले तरुचे
वाऱ्यात सळसळत्या पाती
वाजतात ग वाळे तरुचे
दवबिंदूं चे करित शिंपण
पूजन अर्चन चाले तरुचे
काव्य कळ मी जलद सुनेत्रा
सहज उघडे टाळे तरुचे