करमत नाही मम जीवाला घराशिवाय
मैत्र जवळचे खरे कुणाशी स्वतःशिवाय
भरती आली अन ओहोटी पाठोपाठ
सागर तीरी अगणित मासे गळाशिवाय
तडफडणाऱ्या मासोळ्यांचा खच रेतिवर
तप्त वालुकी जगतिल कैश्या जळाशिवाय
उभ्या आडव्या रेषा रेखुन तर्जनीने
खेळ रंगतो मृदुल मृदेवर पटाशिवाय
हृदय जिनालय शुद्ध भाव मम किमयागार
पूजन करण्या चरण कुणाचे जिनाशिवाय