हात असावे कुणीतरी
ज्ञात असावे कुणीतरी
विडा त्रयोदश गुणी खरा
कात असावे कुणीतरी
दिवा तेवण्या तेल झरे
वात असावे कुणीतरी
जरी आजचा शुभ दिन पण
रात असावे कुणीतरी
गुलाब किल्ली जपावया
जात असावे कुणीतरी
चिंब व्हावया शांत रसे
न्हात असावे कुणीतरी
सयी ‘सुनेत्रा’ मृदगंधी
तात असावे कुणीतरी जपावया