गझलेसाठी गझल हवी .. सृष्टीसम ती कुशल हवी …
वरवर वाटे कुरल जरी .. अंतरातुनी सरल हवी…
जरी दाटते गच्च मणी .. झरताना पण तरल हवी …
नको कोरडी ठक्क बरे .. जलदासम ती सजल हवी …
गझल सराईत गझल नवी .. नित्य वाटण्या नवल हवी …