खरा अर्थ ना चा मला सांग तू रे
जसे होय हो ना तशी भांग तू रे
लगा गाल गागाल गा गाल गा गा
अशी चाल लावून दे बांग तू रे
मना वाटते ते इथे मांडले मी
जरी ना दिलेला कुणा थांग तू रे
लिहाया पुसाया पुसूनी स्मराया
कसे नित्य बघतोस पंचांग तू रे
पहा पाच शेरांसवे गझल शोभे
नको आज मोडूस ही रांग तू रे