आत्मा माझा गुरू खरा
निश्चय नय हा धरू खरा
व्यवहाराची साथ मिळे
खेळ जाहला सुरू खरा
पुद्गल असती शब्द जरी
मंत्र अक्षरी भरू खरा
लंबक दोले हळूहळू
भाव अंतरी झरू खरा
मूर्त सुनेत्रा घडवाया
चिरा चिऱ्याने चिरू खरा
आत्मा माझा गुरू खरा
निश्चय नय हा धरू खरा
व्यवहाराची साथ मिळे
खेळ जाहला सुरू खरा
पुद्गल असती शब्द जरी
मंत्र अक्षरी भरू खरा
लंबक दोले हळूहळू
भाव अंतरी झरू खरा
मूर्त सुनेत्रा घडवाया
चिरा चिऱ्याने चिरू खरा