जरी चिडविले कुणावरुन पण खोडी थोडी खरी हवी
कोण कुणाच्या गोष्टी सांगे त्यातिल गोडी खरी हवी
कुणा धबधबा कुणास अभयारण्य पावते खरेच का
आत्मधर्म रथ पुढे न्यावया उमदी घोडी खरी हवी
खरडत झरझर बघून कॉपी बखरीमधुनी करताना
इतिहासातिल सत्य जाणण्या पळती मोडी खरी हवी
शतजन्मांतिल नातीगोती कशास स्मरणे या जन्मी
धन्य व्हावया मनुज जन्म मम आगम होडी खरी हवी
पूर्वकर्म जाणून करावी धर्मसंगती जिनांसवे
वंशवेल बहराया जगती तनमन जोडी खरी हवी