गझलमणी – GAZAL MANEE


जादुगार सोन्यासम पिवळा,करांगुलीवर नीलमणी..
खरा दागिना हेमंताचा,झळाळणारे शील मणी…

सोन्याचे मी मणी गुंफिता,जुन्याच धाग्यामधे पुन्हा..
कनक मण्यांच्या माळेमध्ये,झाले नव सामील मणी …

गळ्यात काळी पोत मण्यांची,मोजले न मी मणी जरी…
अजून कांही आले तेंव्हा,करण्यासाठी डील मणी…

आई माझी शिरोमणी जणु ,कधी न गळले अश्रु तिचे…
मोरपिसांसम मायेच्या मज,तिच्या सयी सच्छील मणी…

स्फटिक मण्यांची माळ जपाची,मणी एकशे आठ तीन..
जपता जपता ‘आई दादा ‘ कसे करावे सील मणी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.