पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर.. शिशिरानंतर…
वसंत येता पुन्हा लहरते फुलल्यानंतर.. शिशिरानंतर…
ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या बी अंकुरण्या..
भिजते खुलते जमीन बीजे रुजल्यानंतर.. शिशिरानंतर…
शरदचांदणे हेमंताची शाल सुनहरी निळ्या अंबरी
पांघरून मन हृदय सजावे भरल्यानंतर.. शिशिरानंतर…
कागद कोरा त्यावर कशिदा विणता भरता गात लेखणी..
ऊन सोसते घाम गाळते शरदानंतर.. शिशिरानंतर…
बिंब हलतसे पाण्यामधले थरथर त्याची पानोपानी..
गा गा शेरा भाव अंतरी झरल्यानंतर.. शिशिरानंतर…