वृत्तीत मातृकेचे गाणे नवे वळेल
लालूच मोहवेना मनमोर का चळेल
आत्म्यात देव अपुल्या त्याच्यापुढे झुकून
समजाव तू स्वतःला तेव्हाच नय कळेल
सुम्भात पीळ आहे प्राचीन कर्म मूळ
तो पीळ सहज सुटता तव पुण्य फळफळेल
पंचांग पाहशी तू मिळवावयास पीठ
जात्यात घास नाही मग काय ते दळेल
सद्धर्म दर्शनाचे जेंव्हा रुजेल बीज
हृदयात अंकुराची चाहूल सळसळेल