आज कोणती नेसू साडी प्रश्न मला ना अता पडे
आज चालवू कुठली गाडी प्रश्न मला ना अता पडे
जीव जगावे इतुकी इच्छा सदैव माझ्या मनी वसे
आज लुटावी कुठली वाडी प्रश्न मला ना अता पडे
बाड धाडले कुणीतरी मज रंगबिरंगी रद्दीचे
आज कोणते पुस्तक बाडी प्रश्न मला ना अता पडे
ताडी माडी नीर गाळणे धंदा माझा प्रिय मजला
आज कुणाला पाजू ताडी प्रश्न मला ना अता पडे
धर्म कोणता मम आत्म्याचा उत्तर मिळण्या प्रश्नाचे
आज आवळू कुठली नाडी प्रश्न मला ना अता पडे
कितीक सागर कितीक बेटे किती किनारे या जगती
आज कोठली गाठू खाडी प्रश्न मला ना अता पडे
मक्त्यामध्ये नाव सुनेत्रा घुसडायाला नवे जुने
आज कुणाची स्मरू चहाडी प्रश्न मला ना अता पडे