चुक्ती – CHUKTEE


केल्यावर तुज सक्ती मीही
बाकी केली चुक्ती मीही

खूप पाहिली वाट म्हणाया
हवीच मजला मुक्ती … मीही

नवल वाटते दगडाचीही
केली होती भक्ती मीही

स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी
वाढविली मम शक्ती मीही

नाव ‘सुनेत्रा’ सिद्ध कराया
कधी करितसे युक्ती मीही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.