घन काळे काळे गगनी
भादवा दवा आत्म्याला
चिरि कुंकू रेख ललाटी
दे जाप्य काव्य कुसुमाला
जोडून करांचे तळवे
जुळविली कराग्रे दाही
मी भाव अर्घ्य दिधले
पारणा व्रताची झाली
निळीशार हवेली मौन
रानभर सळसळे ऊस
कलशात खिराया दहिवर
थांबला जलद पाऊस
किरणांनी जादू केली
निवळली धुक्याची दुलई
सृष्टीशी गप्पा गोष्टी
झंकार चौघडा सनई