कुठेतरी भुंकतेच कुत्रे
वादळात उडतातच पत्रे
चित्रकार नसतातच भित्रे
हवी तशी रेखतात चित्रे
एक असे जे ते तर संत्रे
बहुवचनी संत्री अन छत्रे
पुत्राचे बहुवचन न पुत्रे
तसेच मंत्राचे ना मंत्रे
एका दिवशी अनेक सत्रे
आडनाव आठवले अत्रे
गरगर फिरती कैक जनित्रे
वहीत माझ्या त्यांची चित्रे
मक्ता लिहिते खास सुनेत्रा
गुंफाया शेरांची सुत्रे