जिनबिम्ब – JIN BIMB


मुक्तक … जीव जीवात आहे

रंग लावायचे रंग खेळायचे वय सरून गेले
जीव जीवात आहे आतले भय सरून गेले
धर्म कर्मात माझ्या खरा जाणते मी मला “सुनेत्रा”
देव हृदयी जपायास कांडातले मय सरून गेले

गझल गज़ल
पहिली ओळ मराठी .. दुसरी ओळ हिंदी …..

पुष्प गजरा गझल चंचल
गा रहा है पवन चंचल

मृत्तिकेतिल दलदलीने
फ़लसफ़ाकी फसल चंचल

सोनचाफा कुंतली घन
तन अबोली नयन चंचल

बहरता निवडुंग काटे
अक्षरों का चलन चंचल

अंतरी जिनबिम्ब वसुदे
झील अंबर सजल चंचल

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.