टेच – TECH


म्हणतात खेच बाही
टळण्या बळेच काही

माझेच मज मिळाले
फुकटात टेच नाही

पाऊस हा असाकी
फुटले घडेच दाही

बदलव स्वतः स्वतःला
पंचांग पेच वाही

प्रत्येक दिस निराळा
घडते न तेच माही

होईल तव अहंची
लागून ठेच लाही

गझलेतुनी बरसतो
तो मोद वेच राही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.