कवितेसाठी कारण मजला सकाळ सुंदर आहे
गझलेसाठी सुंदर कारण मनात मंदिर आहे
काव्यसंपदा माझी मजला निळसर अंबर आहे
किणकिणणारे घरात माझ्या झुलते झुंबर आहे
एक जादुई माझ्यापाशी वजनी कंकर आहे
गझलियतीचा त्यात टाकला मी रे मंतर आहे
खेळायाला उड्या मारुनी डेपो टिंबर आहे
पटांगणावर बूच फुलांनी सजला डंपर आहे
गझलेमध्ये मक्ता लिहिणे हा नच संगर आहे
सौरभ प्राशुन तिप्प तिप्प हे भरले अंतर आहे