मन शीतल कर चिंब भिजाया शुष्क भावना
तपून अश्रू पिंडी झाल्या रुक्ष भावना
दुबळे मन जर होते हळवे वात्सल्याने
देत सावली व्यक्त करतसे वृक्ष भावना
शुद्ध अशुद्धाची चर्चा बस गडगडणारी
धवल घनांना सजल बनवती कृष्ण भावना
किती जागुनी गस्त घालशिल स्वतः स्वतःवर
नीज सुखाची येण्या पांघर सुस्त भावना
गझलेमधला गळेल पारा वृत्त फोडुनी
साच्यामध्ये ठोकशील जर रुष्ट भावना
कधी उसळते नीर कधीतर बनून वारा
लहर शिवारी करुन मोकळ्या मुक्त भावना
मातीमधुनी हात जोडते हिरवे सोने
ठिबकताच भूवरी सुनेत्रा तृप्त भावना
शब्दार्थ
तिप्प …तृप्त