नखशिखांत मी यशात न्हाले
मज न भ्रांत मी यशात न्हाले
गीत लिहितसे स्वतंत्रतेचे
हृदय प्रांत मी यशात न्हाले
उदकचंदनी नऊ रसांसह
तिप्प शांत मी यशात न्हाले
मेघ जलद वा बनून जलधर
घन सुखांत मी यशात न्हाले
रंगवून मम अलक सुनेत्रा
गझलकान्त मी यशात न्हाले
शब्दार्थ
तिप्प – तृप्त
सुखांत – सुखी शेवट
अलक – अती लघुत्तम कथा