नवरात्रीचा सण सौख्याचा नवधन निर्मितीचा
घटस्थापना भूमीवरच्या घटात करण्याचा
नऊ रात्रीचे रंग गंध रव स्वाद स्पर्श जपण्यास
विजया दशमी होय साजरी दशदिशा सजण्यास
दसरा झाला हसरा बाई हास निसर्गा झरा होऊनी
दुहितेला कर जलदायिनी वाहत खळखळुनी
पक्षी गाती जंगल करण्या मंगलमय अवघे
चला जाऊया फिरावयाला हृदय घेऊनी संगे
पुनव पौर्णिमा कोजागिरीची सयी तुझ्या आई
धवल गान चांदण्यात करण्या दादांची वनराई