पहाटे पहाटे मला गझल भेटे
पहाटेस वेडे खरे नवल भेटे
निसर्गास गाणे नवे ऐकवाया
पहाटे खगाला धरा सजल भेटे
दवाने भिजूनी सुगंधात खिरता
पहाटे गुलाबी हवा तरल भेटे
ऋतू पावसाळी गडद गडद न्यारा
पहाटे निळ्याशा जळी कमल भेटे
नशीली तराई निशा नागमोडी
पहाटे पुन्हा पण वळण सरल भेटे