नाजुक तंतू – NAAJUK TANTOO


सालांमध्ये साल पावले वीसएकविस साल मला
सरोवरे मी कैक पाहिली पहायचे पण दाल मला

सदैव गाठी बसती तुटती नाजुक तंतू ताणून ग
हलके हलके सोडव गुंता म्हणते आंतरजाल मला

धवलगान वर्णांचा ऐवज मोक्षाचा सोपान खरा
दिडदा दिडदा बोल सांडती रंगांनी प्रक्षाल मला

जुनाच मुखडा नवा अंतरा म्हणता म्हणता सां सां ध प
भूपाळीचे स्वर भक्तीमय पुसती हालहवाल मला

नुरले उरले मुरलीचे स्वर झुंजूमुंजू धरेवरी
चंद्रकोर रेखून सुनेत्रा सांगत आहे भाल मला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.