जिनशासन सत सत्ता आहे
गिरवायाला कित्ता आहे
नको सुपाऱ्या कुटूस चिकन्या
कातरण्या अडकित्ता आहे
फतरी पान न करी पकडले
हा हुकुमाचा पत्ता आहे
खलात खलबत जिरवायाला
संगमरवरी बत्ता आहे
चित्रामध्ये गुरगुरणारा
चित्तचोर नव चित्ता आहे
दार मागचे खुले सर्वदा
बार नव्हे तो गुत्ता आहे
पगार महिना हजारात पण
शतपट मिळतो भत्ता आहे
भावपूर्ण अष्टक जयमाला
अर्थपूर्ण अन घत्ता आहे
गझल सुनेत्रा मक्ताधारक
प्रहार करण्या लत्ता आहे