पात्र निर्झरी झुकून लागले भरायला
लाल लाल लाल लाल लाल लाल लालला
पर्ण पाकळ्या सचैल चिंब वल्लरी झरे
तापल्या झळांत गात मुकुल बहर टिकवला
कोणती लगावलीय वृत्त नाम कोणते
मी न शोध घेत बीत काव्य धर्म भावला
अंतरातल्या जळी समुद्र गुप्त जाहला
शीळ घालतो न पवन कुंदनात मढवला
कर्म धर्म ज्ञान ध्यान गुरुकुलात साधना
सावलीत शीत तृप्त जीव मम सुखावला