पाळणा – Cradle


हवा जादुई .. झुले पाळणा पानांचा हिरव्या ..
फांदीवर झुलणारे झुमके जर्द लाल पाकळ्या…..
दगड विटांशी पाचोळ्याशी करण्या गुजगोष्टी ..
चिवचवणारी रानपाखरे भवताली उडती…..
दूरदूरवर आगीनगाडी झुकझुक धावत जाई ..
गतकाळातील सुखद स्मृतींची मनात गर्दी होई …..
निसर्गातल्या सदैव जागृत जिनशासन देवता..
पंचमहाभूतांसह जपण्यासाठी लय ताल जीवनाचा…..

नवरंगांची सप्तस्वरांची करतात साधना भुंगे ..
सूर ताल लय नाद अंतरी ऐकत पानांसंगे …..
हवा जादुई .. झुले पाळणा पानांचा हिरव्या ..
फांदीवर झुलणारे झुमके जर्द लाल पाकळ्या…..

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.