चौकी माझी माझी आई
मायबोली ग कन्नड ताई
मी जाणे रे कर्मबंध मम
हांवि न मजवर मोही राई
जळते ज्याचे त्याला कळते
फुकट कशाला जाळू शाई
विविध बोल पण साद घालते
मॉमी मम्मी मैय्या माई
तलम ओढणी निळसर अंबर
मुक्त चांदण्या ठायी ठाई
माय जिजाऊ येऊ अव्वा
स्वराज्य स्थापुन गाणे गाई
बाईजामा अम्मा साध्वी
टाळ “सुनेत्रा” हुनची काई