बॉयलर सूट – BOILER SUIT


पाश! तुझी ती लोखंडावरची कविता… .
वाचलीहं मी!!..
किती किती अन काय बनवतात रे लोखंडापासून..
खरंच लोखंडाची महत्ता अगाध आहे हो…

तसा मी पण एक जॉब बनवला होतलोखंडाचा..
स्मिथी मध्ये… टीन एजर असताना..
आणि एक टिनचा बॉक्स पण बनवलेला टिन स्मिथी मध्ये!!

बॉयलर सूट बनवून म्हणजे शिवून घेतलेला ..
शिंप्याकडून.. मोठ्या हौसेने!
स्मिथी प्रॅक्टिकलसाठी ”’
बॉयलर सूट …जांभळ्या रंगाचा!

घामाघूम झालेले आम्ही सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी
आणि .. अवतीभवतीच्या भट्ट्यांवर लोखंड तापवून
त्यावर घणाघण घाव घालणारे
स्मिथीतले सर लोकं … गुरु ..महान संयमी !

हातात लोखंडाचा ठोकळा घेऊन
चेहऱ्यावरचा घाम पुसत ,,इकडेतिकडे फिरत असताना..
एखादे सर खसकन हातातला ठोकळा ओढून घ्यायचे…
आणि भट्टीत टाकून लालभडक करायचे..

आणि मग ऐरणीवर घेऊन ..
घणा ने हवा तसा दोनच मिनिटात ठाकून ठोकून ..
मुशीत न घालताच ..
परिपूर्ण झालेला तो जॉब हातात द्यायचे… थंड करून…

तेव्हा वाटायचे ..सुटले बाई!..हुश्श्य”!!
मिळाला एकदाचा जॉब…
सरांचे तप्त बोल मात्र कानावर पडायचे…
या अश्या मुली .. कशाला येतात इथे…
डोकंच भडकते …यांना इथे पाहिल्यावर…

सरांचे तापलेले विचार… डोकं .
मग हळूहळू वितळत वितळत थंड होत असावेत..
त्या जॉब प्रमाणेच …

मेंदूला झिणझिण्या आणणारी ती स्मिथी लॅब ..
आठवते अधूनमधून कधीकधी!!…
आणि मग अलीकडे माझ्यापण मेंदूतली कुठलीशी नाजुकतार …
झिनी झिणी वाजायला लागते,,,
मग मी उठते…झंकार …सावरत…
माझ्या मुदपाकखान्यात शिरते…

खास भट्टीत लोखंड वितळवते …
काव्यरसाचा खदखदता अविष्कार!!
जसेकी भूमीच्या पोटातून
किंवा डोक्याला पडलेल्या
चिरफळीतुन…उसळलेला लाव्हारस !

ओतताना भांड्यातून कागदावर…
सांडशीने घट्ट भांडे पकडून…कसरतच करते असते मी !

मग लाह्यांसारखे गोळे ..फटाफट फुटून ..
किचन कट्ट्यावर धावत उडत असतात सैरावैरा…!
लाव्हारसाच्या लाह्या..
गोलाकार काटेरी लाह्या..
संक्रांतीच्या हलव्यासारख्या ..
शुभ्र ..पिवळासर मातकट लाह्या…
!!
पाश! तू खरोखरच ग्रेट गुरुबाबा आहेस!..
तू लोखंड पचवलंस .. पण..
मी पण काही लेचीपेची नाही रे भावा !

मी असे काटेरी चणे बनवून कांचपात्रात भरून ठेवलेत.
.कधीकाळी !
संक्रांतीच्या सणासाठी!
आता तशी खात असते मी सुद्धा येत जाता ..
अधूनमधून लोखंड……लोखंडाचा काटेरी हलवा ??
नो ! नो ! नो!!!

मी खाते लोखंडाचे चणे फुटाणे!…
भटकाडली… !
मजा येते खायला… कडम कडम.खायला …
कारण मी ते सहज पचवते …
आणि जीवनरसाने भरू शकते ..भरते..
माझी गात्रंनगात्रं …. !!!!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.