काकडारतीला दाटे .. बनी केतकी सुगंध
रेशमाच्या धाग्यांसवे .. जुळावया भावबंध
झरे पाऊस आषाढी .. जीव अजीवाचा बंध
गाठणीला चार दाणे .. रुजावया मृदा गंध
आस्त्रवाला पंचभूते .. शेत साळीचे डोलते
संवराला निर्जरेला .. मोक्ष तत्त्व एकसंध
झाला खरा आरंभ रे .. सत्य युगाचा न अंत
भक्त पूर्ण जागा झाला .. तडकूनी न्याय अंध
देह राऊळात आत्मा .. तीर्थंकर जिनालयी
काळसर्पाच्या काऱ्यात .. भूत डाकीण समंध
अष्टाक्षरी गझल.. मात्रा.. १४/१२