हाताने कर मसाज चेंडू
घरातले कामकाज चेंडू
गुगलीवरती षट्कारास्तव
उसळुन फळीवर गाज चेंडू
मोजिन टप्पे झाकुन डोळे
ठोकत फरशीस वाज चेंडू
बिंब स्वतःचे स्वतःत बघण्या
मला कशाची न लाज चेंडू
कसे जगावे आनंदाने
शिकव जगूनी रिवाज चेंडू
लय मस्तीचा धरून ठेका
मनापुढे पढ नमाज चेंड
भोगरोग जर छळतो वृद्धां
शोध तयावर इलाज चेंडू
अनवट कोडे ना जर उकले
म्हणू रहस्यास राज चेंडू
दर्शन घेता जिनदेवाचे
ऐक रे मम आवाज चेंडू
चिरल्या चिरल्या वापरून घे
ओनियन कांदा प्याज चेंडू
मक्त्यामधले नाव सुनेत्रा
आहे टिकवून बाज चेंडू