तरही गझल – मी पुन्हा जन्मले होते
मूळ गझल – जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते
गझलकार – राज पठाण
जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते
मरणाच्या उंबरठ्यावर मी पुन्हा जन्मले होते
मज वाढायाचे होते जन्मात नव्या या सुंदर
पण तनू खंगली झिजली म्हणुनच हळहळले होते
नव्हताच दुवा कुठलाही जोडाया नाते अपुले
तू समक्ष खात्री द्यावी यासाठी अडले होते
मज थोडे थोडे कळले तुज कळले पण ते उशिरा
कळल्यावर मजला पुरते तुजसाठी रडले होते
मैत्रीतिल प्रीती जपण्या प्रीतीतिल मैत्री टिकण्या
मी गझलेमधुनी तुजला छळले अन पिडलेहोते
मात्रावृत्त – १४+१४= २८ मात्रा