आज कोणता शब्द वापरू रदीफ म्हणुनी
तंग काफिया हिंदी उर्दू खलीफ म्हणुनी
गुरू इलाही जैसा कोणी असेल जर तर
सहजच सुचले तीन काफिये शरीफ म्हणुनी
एक जाहले दोन शब्द हे मजनू मजनी
कुठला निवडू रामबाण मी अलीफ म्हणुनी
साक्षी भावे न्याय कराया शब्दार्थांचा
भाव खरोखर टिकेल सच्चा हनीफ म्हणुनी
लतीफ आणिक हनीफ मिळता गझल पूर्ण मम
सार्थक या जन्मी जीवांचे मुनीफ म्हणुनी
दिवाळीत मज हवाच पैका खिसा वाहण्या
उधळ अक्षरे पीक घ्यावया खरीफ म्हणुनी
सम्यकदर्शन ज्ञान आचरण संगे संगे
हेच सुनेत्रा रत्न मक्ति तव लतीफ म्हणुनी