सोडून सर्व देते धरले कधी न काही
गझलेस रंग देण्या मी माझियात पाही
वाटा अनेक होत्या काहीच मी निवडल्या
जगणे मजेत होते झाले कधी न त्राही
माझेच गीत मजला पण वाटते न माझे
देण्यास मोद सर्वां म्हटले कधी न नाही
गोष्टीत शील कोणा मन कल्पनाच वाटे
गोष्टीवरून कोणी शोधेल मूळ राही
गझलेस पूर्ण करण्या साकी उभीच आहे
मक्त्यास नाव माझे गझला दिशात दाही