प्रभातीस मी लिहिते काही
प्रभातीस आठवते काही
किलबिल ऐकत पक्ष्यांची मज
प्रभातीस जागवते काही
….
लिहिण्यासाठी सहज सुचावे
स्वप्न मराठी तुझे तुझे हसावे
व्यक्त कराया भाव मोकळे
भाषेचे ना बंधन व्हावे
….
रोज लिहावे असेच काही
अक्षरांतुनी हसेल काही
लिहिता लिहिता झरती डोळे
देणे त्यातुन जमेल काही
….