विठू माऊलीचा लळा
दाटुनिया येई गळा
रखुमाई सांगतीया
जाण गळवटी कळा
बोल माणसा तू आता
पुरे झाला कळवळा
अन्यायाच्या तोंडापुढे
फोड कोंडाळ्याच्या नळा
उपेक्षित कलावंत
गाठ त्यांच्या मन तळा
किती अश्रू साठलेले
वाहूदेत घळाघळा
पदराने नका पुसू
वाळूदेत झळझळा.