चोवीस तीर्थंकर गुरु ऐसे
चोवीस ताशी घड्याळ जैसे
दिवस स्वतःचा वेळ स्वतःची
रात्री येण्या झोप सुखाची
रत्नत्रय हृदयात स्थापना
हा आत्म्याचा धर्म बाणा
दशलक्षण पर्वात करावी
पूजा उत्तम दहा गुणांची
कल्पनेत इतुके न रमावे
कि व्यवहाराचे हसू व्हावे
निश्चय अंतरी ठाम असावा
व्यवहाराने साधत जावा