वाजता झुलता कटीचा कनक छल्ला
वाटतो ना दूरचा कुठलाच पल्ला
पापण्या ओढून घेता लोचनांवर
आसवांचा साठलेला फोड गल्ला
माय राती जोजवीता तान्हुल्याला
गुंफ अंगाईत लोरी शब्द लल्ला
मांजरे मिचकावता डोळे मिटूनी
गझलच्या भाषेत द्यावा काय सल्ला
आंधळ्या कोशिंबिरीच्या सोड खेळा
ठोकुनी शड्डू फडी तू उतर मल्ला
पूर्व पुण्याईच संधी देतसे बघ
मारण्या लोण्यावरी बोक्यास डल्ला
कर्मभूमी पुण्यनगरी मम सुनेत्रा
दो नयांनी थोपवीण्या मिथ्य कल्ला